Shreeyansh Legal
Shreeyansh Legal
Sep 28, 2019
*.सोसायटी* *रजिस्टर* *करुन* *थांबु* *नका* *तर* जशी सोसायटी रजिस्टर करुन घेतली आहे तसेच *सोसायटीच्या* *पायाखालची* *जमीन* *सोसायटीच्या* *नावे* *करून* *घ्या* . म्हणजेच कन्व्हेयन्स करून घ्या. एकदा का *सातबारा* *उतारा* *सोसायटीच्या* *नावे* *झाला* की तुम्ही *करोडो* *रुपयांचे* *बाप* *झालात* . म्हणजेच आपली इमारत *आपणच* *नव्याने* *इमारत* *बांधकाम* *करून* *घेऊ* *शकतो* सर्व *शासकीय* *परवानग्या* घेऊनच. म्हणुनच सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या सोसायटीच्या नावे जागेचा सातबारा उतारा ( कन्व्हेयन्स) करून घ्या. *अन्यथा* *इमारत* *उभी* *असेपर्यंतच* *आपण* *आपल्या* *घराचे* *मालक* एकदा का इमारत *धोकादायक* *ठरली* / *तुटली* / किंवा *निष्काशित* झाली की आपला *अधिकार* / *हक्क* *संपुष्टात* *येतो* . आणि *जमीन* *मालक* म्हणतो की *इमारत* *तुमची* होती *.* *सातबारा* *उतारा* *माझ्याच* *नावाने* *आहे* . तेव्हा जागे व्हा आणि सोसायटीच्या नावे जागेचा सातबारा उतारा (कन्व्हेयन्स) करून घ्या. *फ्लॅटधारकांनो जमिनीचे मालक* *व्हा! ‘कन्व्हेंस डीड’ करा!* *नाहीतर देशोधडीला लागाल!* नंतर धावपळ करून काहीच हाती लागत नाही. फक्त राहतो तो पश्र्चाताप. त्यामुळे उघडा डोळे विचार करा नीट मुंबईत गोरेगाव पूर्व येथील तीन मजली इमारत काही वर्षांपूर्वी कोसळली होती. त्यातील बिऱ्हाडे उघड्यावर पडली. यामुळे त्यांनी *बिल्डरकडे इमारत पुन्हा बांधून देण्याची मागणी केली. पण बिल्डरने साफ नकार दिला.* त्यामुळे रहिवाशांनी बिल्डरने फसवणूक केल्याचा दावा करीत ग्राहक न्यायालयात धाव घेतली. पण ग्राहक न्यायालयात *सुनावणीचेवेळी या इमारतीसंदर्भात 'कन्व्हेंस डीड'चा विषय समोर आला. http://www.shreeyanshlegal.com/
Learn more